योजनेचे ४ घटक / Preffered Scheme

झोपडपट्टी पुनर्वसन (घटक क्र. १)

 • जमिनीचा साधन संपत्ती म्हणून त्यावरील झोपडपट्ट्या 'आहे तसेच पुर्णविकास करणे'.(शासकीय जागेवरील झोपडपट्टीचा विकास कंत्राटदार यांच्या माध्यमातून करणे )
 • ३२२ चौ .फु . चटई क्षेत्रा पर्यंत
 • रु २. ० लक्ष
 • सन २००० च्या पूर्वीपासून आजपर्यंत सदर शासकीय जागेवरील झोपडपट्टी मधील राहण्यास योग्य जागेवर व आरक्षण नसलेल्या जागेवर अतिक्रमण करुण राहणाऱ्या कुटुंबकरीता
 • जमिनीचा वापर साधनसंपत्ती म्हणून करून झोपडपट्ट्याचा विकास करणे अपेक्षित आहे

क्रेडिट लिंक अनुदान (घटक क्र. २)
(EWS आणि LIG)

 • कर्ज सलंग्न ब्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न (LIG) घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. (नवीन घर घेणे, बांधणे किंवा राहत्या घरचा विकास करणे )
 • ६४४ चौ .फु . चटई क्षेत्रा पर्यंत
 • ६.५ % सवलती दराने
  रु . ६. ०० लक्ष चे कर्जे
 • वार्षिक उत्पन्न ६ लाख पेक्षा कमी असल्यास तसेच भाडेकरु, बेघर राहण्यास अयोग्य जागेवर, आरक्षित किंवा स्वमालिकाच्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबकरीता
 • घरकुलाचा निर्मितीकरिता व संपादनाकरिता असून यामध्ये कमी ब्याज दारावर २० वर्षाकरिता ब्याज अनुदान.

क्रेडिट लिंक अनुदान (घटक क्र. २)
(MIG 1 & MIG 2)

 • कर्ज सलंग्न ब्याज अनुदानाच्या माध्यमातून MIG 1 आणि MIG 2 घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. (नवीन घर घेणे, बांधणे किंवा राहत्या घरचा विकास करणे )
 • MIG 1 ९० चौ .मी . चटई क्षेत्रा पर्यंत आणि MIG 2 १२० चौ .मी . चटई क्षेत्रा पर्यंत
 • MIG 1 ४ % सवलती दराने रु . ९. ०० लक्ष चे कर्जे
  आणि MIG 2 ३ % सवलती दराने रु . १२. ०० लक्ष चे कर्जे
 • वार्षिक उत्पन्न १२ लाख पेक्षा कमी असल्यास तसेच भाडेकरु, बेघर राहण्यास अयोग्य जागेवर, आरक्षित किंवा स्वमालिकाच्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबकरीता
 • घरकुलाचा निर्मितीकरिता व संपादनाकरिता असून यामध्ये कमी ब्याज दारावर २० वर्षाकरिता ब्याज अनुदान.

भागीदारी मध्ये परवडणारे गृहनिर्माण(Flat System)(घटक क्र. ३)

 • खाजगी भागीदारी तत्यावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. (खाजगी विकासाच्या सहाय्याने परवडणाऱ्या घरांची निर्मिती)
 • ३२२चौ .फु . चटई क्षेत्रा पर्यंत
 • रु २.५० लक्ष
 • वार्षिक उत्पन्न ३ लाख पेक्षा कमी असल्यास तसेच भाडेकरु, बेघर राहण्यास अयोग्य जागेवर व आरक्षित कथित जागेवर राहणाऱ्या कुटुंबकरीता.
 • शासकीय यंत्रणा व खाजगी संस्थांशी भागीदारी करून घरकुलांच्या निर्मितीचे उध्दिष्टे आहे .

लभर्थीद्वारे व्यक्ति घर बांधकाम / सुधारना (घटक क्र. ४)

 • आर्थिक दृष्ट्या (EWS) दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अथवा घरांची वाढ करण्यास अनुदान . (व्यक्तिगत स्वरूपातील घरकुल बंधणे )
 • ३२२ चौ .फु . चटई क्षेत्रा पर्यंत
 • रु २.५० लक्ष
 • वार्षिक उत्पन्न ३ लाख पेक्षा कमी असलेल्या तसेच सर्व भागातील राहण्यास योग्य जागेवर व आरक्षण नसलेल्या जागेवर स्वमालिकीच्या कच्च्या व कच्च्या / पक्क्या घरात राहणाऱ्या कुटुंबकरीता.
 • स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घरकुल बांधण्यास अथवा राहत्या घराची वाढ करण्यास